Rajeev Namdeo Rana lidhorI

गुरुवार, 23 अप्रैल 2020

मराठी लघुकथा "दूसरा विवाह" (राजीव नामदेव "राना लिधौरी")

                    मराठी- "दूसरा विवाह"
मूल लेखक- राजीव नामदेव "राना लिधौरी"
मराठी अनुवाद- उज्ज्वला केलकर

        दिल्लीमध्ये एका पंचावन्न वर्षाच्या पुरुषाने आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्यातच दुसरे लग्न केले। आम्ही त्याला म्हणालो, अजून पत्नीला जाऊन तीन महिनेसुद्धा झाले नाहीत। आणि तू दुसरो विवाह केलासही।
          दुसरा म्हणाला, आपल्या मुलांचा तरी विचार करायचास नं! ती काय म्हणतील? म्हातान्याला तारुण्याची झिलई चढलीय।
            त्यांनी अगदी शांतपणे उत्तर दिलं, मी माइया दोन्ही मुलांना विचारुनच हा विवाह केला। माझी दोन्ही मुलं परदेशी राहतात। मी तिथ जाऊ शकत नाही आणि त्यांना भारतात यायचं नाही। आता एवढं मोठं घर, मला एकटयाला खायला उठतं। नोकरांच्या भरवशावर तरी किती राहणार? 
          आजकल नोकरांवर इतका विश्वास टाकता ये तो? म्हणून मग मी दुसन्या विवाहाचा निर्णय घेतला। ती घराची देखभाल नोकरांपेक्षा नक्कीच चांगली करेल। माझीही म्हातारपणी नीट कालजी घेईल। त्यामुले माझं एकटेपण तर दूर होईलच, पण आसपास, या गल्लीत, विभागात, समाजात माझा मान सन्मानही वाढेल, की मी एका विधवेला आधार दिला।
             मला त्यांचा निर्णय अगदी योग्य वाटला।
                     #######
          मूल कथाकार- राजीव नामदेव "राना लिधौरी"
                        संपादक "आकांक्षा" पत्रिका
                    अध्यक्ष- म.प्र लेखक संघ टीकमगढ़
           नई चर्च के पीछे शिवनगर कालोनी,
            टीकमगढ़ (मप्र)पिन 472001 भारत
          मोबाइल -9893520965
        Email - ranalidhori@gmail.com
             *मराठी अनुवाद- उज्ज्वला केलकर

कोई टिप्पणी नहीं: